महाराष्ट्र

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांच रोखठोक भाष्य

मुंबई: राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे शेतकरी संघटनांत तीव्र संताप पसरला आहे. त्यात भर म्हणून, विधिमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळताना त्यांचा व्हिडिओ आमदार रोहित पवार आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सादर केल्याने विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. मात्र, कोकाटे यांनी या सर्व आरोपांना नकार देत, मी फक्त मोबाईलवरील जाहिरात स्कीप करत होतो, असा बचाव केला आहे.

या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, सभागृहातील प्रकारामुळे संबंधित निर्णय विधानसभाध्यक्ष किंवा विधानपरिषद सभापती यांच्या अखत्यारित येतो. अजित पवार यांनी कोकाटेंची अद्याप बैठक झालेली नसली तरी लवकरच त्यांची भेट होणार असल्याचे सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की कोकाटे यांचे मागील वर्तन लक्षात घेता यावेळी योग्य ती समज देण्यात येईल आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मिळून त्यांच्या पदाच्या भवितव्याबाबत निर्णय घेतील.

राजकीय जीवनात आणि प्रमुख पदावर काम करत असताना प्रत्येकाने भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, हेच माझं सांगणं आहे. मागे एकदा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून असंच घडलं होतं, तेव्हाही मी त्यांना समज दिली होती. इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं मी माणिकराव कोकाटेंना सांगितलं आहे. माझी त्यांची आता जेव्हा केव्हा भेट होईल तेव्हा मी काय कारवाई करायची ते बघेन, असे स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

4 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

15 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

16 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

19 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

19 तास ago