मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या पत्नीसोबतच चीड आणणारा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. प्रकरणातील पीडित महिला पतीच्या मित्राच्या सांगण्यावरून त्याला कॅफेमध्ये भेटायला गेली.
आरोपी तरुण हा पीडित महिलेच्या पतीचा चांगला मित्र असल्याकारणाने पीडितेने त्याच्यावर विश्वास ठेवला. महिला कॅफेमध्ये भेटायला गेली असता आरोपी तरुण तिला कॅफेमधील एका सीक्रेट कॅबिनमध्ये घेऊन गेला. तिथे आरोपीने पीडितेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावेळी पीडिता मदतीसाठी जोरजोरात ओरडत असून सुद्धा तिची कोणीच मदत केली नाही. इतकेच नव्हे तर आरोपीने पीडितेला याबद्दल कोणालाही सांगितलं तर जीवे मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली.
तीन आरोपींना अटक
पीडितेने सुरुवातीला घाबरुन या प्रकरणाबद्दल कोणालाच काहीही सांगितलं नाही. पण नंतर शेवटी तिने आधारताल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी लगेच यावर कारवाई करत पीडितेच्या तक्रारीच्या आधारे तीन आरोपींना अटक केली आहे.
सीक्रेट कॅबिनमध्ये नेलं अन्…
पोलिसांच्या माहितीनुसार, आधारतालची रहिवासी असलेल्या महिलेने तिच्यासोबत आपल्या पतीच्या मित्राने दृष्कृत्य केल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, प्रकरणातील आरोपीचं नाव मोहित पटेल असून त्याने आपल्या मित्राच्या पत्नीला आधारतालच्या मून लाइट कॅफेमध्ये भेटायला बोलावलं. आरोपीने पीडितेला फोन केला आणि तिच्याशी काहीतरी बोलायचं असल्याचं सांगितलं. पीडिता कॅफेमध्ये पोहचली असता तिला आरोपी एका कॅबिनमध्ये घेऊन गेला आणि तिथे त्याने पीडितेचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. आरोपीच्या वागण्याला पीडितेने विरोध केला असता त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर याबद्दल कोणालाही सांगितलं तर जीवे मारून टाकण्याची धमकीसुद्धा आरोपीने दिली.
पोलिसांचा तपास
पतीचा चांगला मित्र असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून आपण कॅफेमध्ये गेल्याचं पीडितेने सांगितलं. आधारताल पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी मोहित पटेलसह कॅफेचे संचालक अमन राठौर आणि प्रिन्स रजकला अटक करण्यात आली आहे. परंतु, पीडित महिला पतीच्या मित्राच्या सांगण्यावरून कॅफेमध्ये कशी गेली? तिने आरोपीवर सहज विश्वास कसा ठेवला? असे बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या, पोलीस आरोपींची चौकशी करत असून प्रकरणाचा तपासात व्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…