महाराष्ट्र

अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडेबोल; म्हणाले…

विचार करण्याचा प्रश्नच नाही; सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेत्या रुपाली चाकणकर यांना जोरदार शब्दांत सुनावले आहे.

सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत “विचार केला जाईल” असे वक्तव्य केल्याने मिटकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “विचार करण्याचा प्रश्नच येत नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर थेट आक्षेप घेतला.

‘सुनेत्रा पवारच खऱ्या राजकीय उत्तराधिकारी’

अमोल मिटकरी म्हणाले,“सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या खऱ्या राजकीय उत्तराधिकारी आहेत. त्यांच्या शिवाय दुसऱ्या कोणाचाही त्या जागेसाठी विचार होऊ शकत नाही. आज केवळ महाराष्ट्रातच नाही, तर पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे हेच मत आहे. त्यामुळे ‘प्रस्ताव आला तर विचार करू’ अशी भाषा वापरणे हे पक्षाच्या भावनांना धक्का देणारे आहे.”

“सुनेत्रा वहिनीच राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करू. या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका घेणाऱ्यांना आमचे समर्थन नसेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय अध्यक्षपदावरून चर्चा तापली

२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, यावरून पक्षात चर्चा आणि मतभेद उफाळून आले आहेत.

निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

मिटकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले.“आम्हीही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जाणार आहे का? की फक्त वरिष्ठ पातळीवरच निर्णय होणार?” असा सवाल त्यांनी केला.

‘पक्षाचा खरा कणा म्हणजे कार्यकर्ता’

“पक्ष म्हणजे फक्त नेते नाहीत. अजितदादांसाठी जो कार्यकर्ता रडला, ज्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, अजितदादा गेल्यानंतर ज्याच्या घरात आजही सुतक आहे – तो कार्यकर्ता हा पक्षाचा खरा कणा आहे,” अशा भावनिक शब्दांत मिटकरींनी आपली भूमिका मांडली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

16 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

16 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

16 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

16 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

20 तास ago