मनोरंजन

RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची हजेरी; ‘भाईजान’च्या फॅशनवर मोहन भागवतांची मिश्कील टिप्पणी

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. मात्र, बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या उपस्थितीने कार्यक्रमात विशेष उत्साह पाहायला मिळाला.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सलमान खानचे उदाहरण देत समाजात फॅशन आणि ट्रेंड कसे तयार होतात, याबाबत महत्त्वाचे निरीक्षण मांडले. विशेष म्हणजे, भागवत हे विधान करत असताना सलमान खान स्वतः समोर बसून शांतपणे त्यांचे भाषण ऐकत होता.

आपल्या भाषणात मोहन भागवत म्हणाले, “समाजात फॅशन आणि ट्रेंड हे प्रभावातून निर्माण होतात. सलमान खान काय घालतो? महाविद्यालयीन विद्यार्थी तेच परिधान करतात. तो ते का घालतोय, हे कुणालाच माहीत नसतं. पण तो घालतो म्हणून ती गोष्ट लोकप्रिय होते. ती चांगली असो किंवा वाईट, फॅशनमुळे ती समाजात पसरते.”

पुढे ते म्हणाले, “जे लोक फॅशन किंवा ट्रेंड घडवतात, त्यांना समाजात प्रभावशाली मानले जाते. अशा लोकांना आपल्या भाषेत ‘महाजन’ म्हटलं जातं. समाज ज्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ज्यांचा आदर करतो, त्यांचे अनुकरण केले जाते.”

सलमानसह दिग्गजांची उपस्थिती या कार्यक्रमाला सलमान खानसोबतच ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई आणि प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनीही उपस्थिती लावली होती. सलमान खान कार्यक्रमस्थळी पोहोचताच त्याचा एक झलक पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, या कार्यक्रमातील सलमान खानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मोहन भागवतांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago