पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कामगाराची गॅस सिलिंडरने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या घटनेत बालाजी खंदाडे (वय २९) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी प्रदीप गुंडारे (वय ३२) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोशीमधील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर खंदाडे आणि गुंडारे हे दोघे कामगार म्हणून काम करत होते. ते दोघे दूरचे नातेवाईकही असल्याचे तपासात समोर आले आहे. सोमवारी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास जेवण बनवण्याच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या प्रदीप गुंडारे याने जवळच असलेला गॅस सिलिंडर उचलून बालाजी खंदाडे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खंदाडे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर गुंडारे घटनास्थळावरून पसार झाला.दरम्यान, बांधकाम साईटवरील इतर कामगारांनी गंभीर जखमी अवस्थेतील खंदाडे यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रदीप गुंडारे याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी हा मूळचा लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून वादाचे नेमके कारण शोधले जात आहे.
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…