किर्तनातील वक्तव्याचा राग; किर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या कीर्तनातील एका वक्तव्यामुळे काही जण संतप्त झाले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून त्यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली.

घटनेच्या वेळी घरात त्यांची पत्नी, मुलगी तसेच आई-वडील उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळात कुटुंबीयांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, मारहाणीनंतर निवृत्ती महाराज वाडेकर यांनी व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितली. “माझ्याकडून चुकून वादग्रस्त वक्तव्य झाले, त्याबद्दल मी माफी मागतो. मात्र माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर असा हल्ला करणे योग्य नाही. याबाबत कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती,” असे त्यांनी म्हटले आहे.

वाद नेमका कशामुळे झाला?

काही दिवसांपूर्वी झालेल्या चंद्रग्रहणाच्या वेळी सांगलीतील एका गर्भवती महिलेने पालेभाज्या व फळे चिरून खात अंधश्रद्धेविरोधात संदेश देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या घटनेवर भाष्य करताना निवृत्ती महाराज वाडेकर यांनी कीर्तनात त्या महिलेवर टीका केली होती. “ती महिला आपल्या धर्माची नसून दुसऱ्या धर्माची आहे, त्यामुळे आमच्या धर्माविषयी बोलण्याचा अधिकार नाही,” असे त्यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. याच वक्तव्यावरून हा वाद निर्माण झाला असून त्यातून मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

2 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

18 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

1 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

1 दिवस ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

2 दिवस ago