महाराष्ट्र

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भाजपा सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. त्यामुळे गॅस तुटवड्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. १९३० साली इंग्रजांनी मीठावर कर लादल्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवले होते. त्याच प्रेरणेने आज जनतेने आंदोलन करून सरकारला जाब विचारला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही देशाला अनेक जागतिक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र त्यावेळी काँग्रेस सरकारने सर्व घटकांशी संवाद साधत योग्य नियोजन केले आणि इंधन किंवा गॅस तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. आजच्या सरकारकडे मात्र संवाद आणि नियोजनाचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, माझ्यावर व काँग्रेसवर भाजपाच्या नेत्यांकडून खालच्या पातळीवर टीका केली जाते. हा विचार बहुजनांचे हक्क नाकारणारा असून हजारो वर्षांचा संघर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशाच विचारांचा सामना करावा लागला होता. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून फडणवीस यांना सुबुद्धी मिळो, अशी प्रार्थना करतो, असे सांगत त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या “छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता, टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता” या ओळी उद्धृत केल्या.

दरम्यान, विधानभवनात बॉम्ब असल्याचा ई-मेल आल्याच्या घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या घटनेतून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याचे दिसून येते. विधानभवनच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्यभर काँग्रेसचे आंदोलन

गॅसच्या किमतीत वाढ आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावेत आणि गॅस सिलेंडर सुरळीत उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केल्याची माहितीही सपकाळ यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

13 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

15 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago