महाराष्ट्र

वारीत पुन्हा अपघात! भरधाव पिकअपने वारकऱ्याला उडवले; चालक फरार

अहिल्यानगरातील रुईछत्तीशी शिवारात घटना; जखमी वारकरी जिल्हा रुग्णालयात उपचाराधीन

अहिल्यानगर: पुण्यातील ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीवर झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच वारीदरम्यान आणखी एक अपघात घडल्याने वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक २१ मधील वारकरी वसंतराव गावते यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील रुईछत्तीशी शिवारात भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली.

या अपघातात गावते यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाखळे, पोलिस अंमलदार सोमनाथ जायभाय, सोमनाथ वडणे, विकांत भालसिंग आणि वारकऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमींना नगर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी रात्री सावकत गावात मुक्कामी होता. मंगळवारी सकाळी पुढील प्रवासासाठी पालखी निघाल्यानंतर रुईछत्तीशी शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून नगर तालुका पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील जेऊरीजवळ माऊलींच्या दिंडीवर ट्रक घुसून तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वारीतील हा दुसरा अपघात घडल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

9 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

23 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago