महाराष्ट्र

ठाणे होर्डिंग दुर्घटनेनंतर शिंदेंचा अॅक्शन मोड; अनधिकृत होर्डिंग हटवा, मोठ्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश

ठाणे: ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी होर्डिंग दुर्घटनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्स तात्काळ हटविण्याचे आदेश ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.

याशिवाय, पावसाळ्यात वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व मोठ्या होर्डिंग्सचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. धोकादायक ठरणाऱ्या होर्डिंग्सवर त्वरित कारवाई करून बेकायदेशीर फलक उभारणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर ठाणे महापालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून, काल रात्रीपासूनच शहरातील अनधिकृत होर्डिंग्सविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

10 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

23 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago