महाराष्ट्र

अमृत भारत योजनेतून बारामती रेल्वे स्थानकाचा कायापालट; सुनेत्रा अजित पवार यांचे मोदी-वैष्णव यांना आभार

मुंबई: अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा ११.४० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे स्थानक लवकरच राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे.

सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्यांनी खासदार म्हणून तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांमुळे बारामतीकरांचे आधुनिक रेल्वे स्थानकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे.

१९१४ पासूनचा इतिहास असलेल्या बारामती रेल्वे स्थानकाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यानंतर आता त्याचे अत्याधुनिक स्वरूपात आधुनिकीकरण करण्यात आले आहे. स्थानकावर दिव्यांग-अनुकूल सुविधा, आधुनिक प्रतीक्षालय, प्रशस्त पार्किंग, आकर्षक प्रादेशिक स्थापत्यशैली आणि प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या स्थानकातून दररोज सुमारे १,८०० प्रवासी प्रवास करतात.

बारामती हे राज्यातील महत्त्वाचे कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्याने या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, दळणवळण, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

8 तास ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

22 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

2 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

2 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

2 दिवस ago