मी व माझ्या कुटुंबाने एकाच ठिकाणी मतदान केले आहे, भाजपने केलेल्या आरोपांचे खंडन
कराड: माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत. भाजपचे आरोप हे मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच अशी टीका इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी गजानन आवळकर, अजितराव पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत देशमुख, बंडानाना जगताप, नितीन थोरात, नानासो पाटील, शिवाजीराव मोहिते, प्रदीप जाधव, आदींची यावेळी उपस्थिती होती.
यापुढे बोलताना इंद्रजित चव्हाण म्हणले कि, दुबार मतदान नोंद आणि बोगस मतदान यामध्ये फरक आहे. माझे व माझ्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे असलेल्या दुबार मत नोंदणीबाबत आम्ही ज्या त्या वेळी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील नाव कमी करून एकाच ठिकाणी नाव असण्याबाबत अर्ज केले होते परंतु असे असताना आमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत असणे हि निवडणूक आयोगाचीच चूक आहे असे आमचे स्पष्ट आरोप आहेत.
मुळात मतदार यादीमध्येच घोळ आहे व ती सदोष झाली पाहिजे यासाठीच तर आमची मागणी आहे. परंतु निवडणूक आयोगावर आरोप केले तर त्यांच्या मदतीसाठी भाजपचे पदाधिकारी धावून येतात यावरूनच निवडणुकीत नक्की काय प्रकार झाला हे दिसून येते. माझे सद्याचे असलेले वय व मतदार यादीतील असलेले वय यामध्ये तफावत आहे. जर नाव नोंदणी नजीकची आहे तर ती सिद्ध करावी आणि जर दुबार मतनोंदणी प्रमाणे दुबार मतदान केले आहे तर ते पुराव्यासहित सिद्ध करावे अशी आमची मागणी आहे.
५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून देशव्यापी चळवळ उभारणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही मुंबई: विमुक्त समाजाला सहानुभूतीची…
मुंबई: मुंबईतील काही सोसायट्यांना दहा टक्के पाणी कपातीचा फटका बसत असून, नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागवावे…
विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर घणाघात; राहुल गांधींवरील गुन्ह्यावरही संताप नागपूर: केंद्रातील मोदी सरकारची ओबीसीविरोधी मानसिकता…
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…