महाराष्ट्र

कोकण विभागाच्या उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांचे निधन

मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर ( वय ५२ ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.२० मिनिटांनी अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे निधन झाले. त्या मूळच्या चंद्रपूर येथील रहिवासी होत्या.

त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ.अप्रतिम व रीची शंभरकर, वडील भगवान गाडेकर,भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, भाऊ अभिनेता जयंत गाडेकर, बहिण डॉ. मोना व बराच मोठा आप्तपरिवार आहे. १६ ऑक्टोबर रोजी १०१, वसुंधरा सीएचएस, युगंधरा टॉवर, खारघर सेक्टर ८ खारघर स्टेशन रोड लिटल वर्ल्ड जवळ, नवी मुंबई या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दुपारी १२ वाजता पासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता नंतर खारघर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  अर्चना शंभरकर या प्रसिद्ध लेखिका होत्या. त्यांची ‘सोलमेट’ ही कादंबरी तर ‘सारीनास’ हा लघुकथा संग्रह प्रसिद्ध झाला होता. विदर्भातील सुप्रसिद्ध कवियित्री दिवंगत विमल गडेकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

11 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago