क्राईम

पॉलिटिकल कनेक्शनमुळे आरोपी मोकाट! सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त म्हणून कायद्याचा धाक संपला का

मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांवर संताप; शिंदे गटाच्या नेत्याच्या कुटुंबाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे: “सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यामुळे आरोपींना कायद्याची भीती उरलेली नाही का?” असा संतप्त सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेड येथील शिवसेना (शिंदे गट) नेते अनिल लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयाने अत्यंत गंभीर निरीक्षणे नोंदवली.

ऑगस्ट २०२३ मध्ये अनिल लोखंडे यांचा मुलगा आदित्य याचा विवाह झाला. या विवाहासाठी मुलीच्या वडिलांनी सुमारे २ कोटी रुपयांचा खर्च, त्यात ५५ तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार दिल्याचा आरोप आहे. मात्र, त्यानंतरही हुंड्याची लालसा संपली नाही. शेअर बाजारातील नुकसान भरून काढण्यासाठी सुनेकडे १०० तोळे सोने आणि आलिशान कारची मागणी करण्यात आली.

पीडितेच्या तक्रारीनुसार, मागणी पूर्ण न झाल्याने तिच्यावर अमानुष छळ करण्यात आला. गरम तव्यावर हात भाजणे, केस पकडून मारहाण, तसेच खुद्द सासऱ्यांनी पिस्तुल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे गंभीर आरोप आहेत. पतीच्या वाढदिवसालाही ४ तोळे सोन्याचे कडे आणि रोख रकमेची मागणी करत छळ करण्यात आला.

या प्रकरणात न्यायमूर्ती माधव जामदार यांनी आरोपींच्या राजकीय संबंधांवर थेट बोट ठेवले. सत्र न्यायालयाने १५ डिसेंबर २०२५ रोजीच सर्व आरोपींचा जामीन फेटाळला असताना, नियमानुसार तात्काळ अटक होणे अपेक्षित होते. मात्र, महिनाभर उलटूनही आरोपी मोकाट असल्याने न्यायालयाने पुणे पोलिसांना खडे बोल सुनावले.

“आरोपी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असल्यामुळेच पोलीस कारवाई टाळत असल्याचे स्पष्ट दिसते,” असे कठोर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago