चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’चे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण
मुंबई:“शिका, संघटित व्हा” हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र आजही समाजाला दिशा देतो. भारताची सार्वभौम राज्यघटना बाबासाहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केली असून, या संविधानाच्या बळावरच देशातील सर्वसामान्य नागरिकाला न्याय मिळतो आणि देशाचा कारभार लोकशाही मार्गाने सुचारूपणे चालतो, असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित ‘भीम ज्योत’ लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात स्थानिक जनप्रतिनिधी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “बाबासाहेबांनी जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून भारताचे संविधान तयार केले. हे संविधान जगातील सर्वोत्तम घटनांपैकी एक आहे. याच संविधानामुळे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सामान्य माणूसही बाबासाहेबांनी दिलेल्या तत्त्वज्ञानामुळे आणि संविधानिक हक्कांमुळे उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, देशातील दलित, शोषित, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. समाजातील सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हा बाबासाहेबांचा मुख्य संदेश होता.
चेंबूरमध्ये उभारण्यात आलेली ‘भीम ज्योत’ ही केवळ स्मारक ज्योत नसून, बाबासाहेबांच्या विचारांची अखंड प्रेरणा देणारी प्रतीकात्मक ज्योत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. “ही ज्योत बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण सतत करून देत राहील. बाबासाहेबांना मनःपूर्वक अभिवादन करतो,” असे ते म्हणाले.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…