महाराष्ट्र

हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी बाळाने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

मॉरिशस मधील बाळावर नवी मुंबई अपोलोत झाली हृदय क्षस्त्रक्रिया

नवी मुंबई: अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात गंभीर हृदयरोग आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळाला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोगावरील जीवनदान देणारी प्रक्रिया करण्यासाठी ४६०० किमी अंतर पार करून भारतात आणण्यात आले. मॉरिशसमध्ये स्टेबलायझेशन (स्थिरीकरण) झाल्यानंतर बाळाला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे पाठवण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्समध्ये को-आर्क्टोप्लास्टी करण्यात आली, ज्यामध्ये बाळाच्या महाधमनीचा अरुंद भाग रुंद करण्यासाठी ऍब्जर्बेबल (शोषणयोग्य) स्टेंट बसवण्यात आले. ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आणि बाळाला तीन दिवसांनी यांत्रिक व्हेंटिलेटरच्या मदतीशिवाय श्वास घेता आला.

डॉ.भूषण चव्हाण, सल्लागार-बालरोग कार्डिओलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले,”भारतात आणल्यावर बाळाची प्रकती चिंताजनक झाली होती. बाळाला जन्मजात हृदयविकाराचा गंभीर त्रास होता ज्यासाठी लगेच उपचार करणे आवश्यक होते. आम्ही आपत्कालीन को-आर्क्टोप्लास्टी केली या प्रक्रियेमध्ये महाधमनीचा अरुंद भाग रुंद करण्यासाठी ऍब्जर्बेबल (शोषणयोग्य) स्टेंट बसवण्यात येते. या प्रक्रियेनंतर बाळाच्या अवस्थेत लक्षणीयरित्या सुधारणा दिसून आली. बाळाच्या इतर समस्या लक्षात घेता, बाळाला सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणारा हा एक बहु-कुशल अशा टीमचा उत्तम प्रयत्न होता.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

10 तास ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

12 तास ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

15 तास ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

1 दिवस ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

1 दिवस ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

1 दिवस ago