महाराष्ट्र

आरे परिसरातील अतिक्रमणांवर प्रतिबंध घाला, नवीन बांधकामांना परवानगी नको; दुग्धविकासमंत्री अतुल सावे

मुंबई: आरे कॉलनी परिसरातील अतिक्रमाणांवर प्रतिबंध घालावेत, तसेच या भागात बांधकामांना महापालिकेने परवानगी देऊ नये अशा सूचना दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज दिल्या.

आरे कॉलनीचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन व्हावे तसेच येथील अतिक्रमणे संरक्षित करून आरे कॉलनीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवेदनाद्वारे केली होती. याच विषयावर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या, राज्याचे आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी, म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल, एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर, मनपाचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे, अनिता पाटील, वनसंरक्षक व संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले,आरे कॉलनी परिसरात १५ हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील रिक्त जागेवर मोठ्या प्रमाणात टाकाऊ पदार्थ टाकले जातात. तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे तत्काळ थांबली पाहीजेत, यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणा नेमण्याच्या सूचना मंत्री श्री. सावे यांनी दिल्या.

म्हाडा, एसआरए, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच दुग्धविकास विभागाने समन्वयाने या भागाचा विकास साधावा, मनपाने गोडाऊन तसेच बांधकामांना परवानगी देऊ नये, यासाठी आदर्श कार्य प्रणाली तयार करावी, मनपाने याबाबत कडक कारवाई करावी अशा सूचना मंत्री श्री. सावे यांनी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…

2 तास ago

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

15 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

16 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

2 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

2 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

2 दिवस ago