महाराष्ट्र

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सहकाराच्या माध्यमातून क्रांती घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. १९५४ मध्ये त्यांनी सुशिक्षित तरुणांनी राष्ट्रउभारणीसाठी सहकार क्षेत्रात काम करण्याचे आवाहन केले. त्यातून साखर कारखाने, सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था आणि पतसंस्थांची मोठी चळवळ उभी राहिली. महाराष्ट्रात सहकार क्षेत्र उभे करण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. मात्र, सध्या सत्तेत असलेले लोक सहकाराचे नसून ‘स्वाहाकाराचे’ आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

टिळक भवन येथे काँग्रेसच्या सहकार विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सहकार विभागाच्या प्रमुख शुभांगी शेरेकर, प्रदेश काँग्रेसच्या वित्त विभागाचे प्रमुख विश्वास उटगी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले की, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र, आज कार्पोरेटचा जमाना आहे. केंद्र व राज्य सरकार ‘हम दो, हमारे दो’ एवढ्यासाठीच असल्याचा आरोप करत त्यांनी अदानी-अंबानी यांच्या हाती छोटे-मोठे उद्योग एकवटत असल्याची टीका केली. अशा परिस्थितीत सहकार क्षेत्र जपणे अत्यंत गरजेचे आहे.

सहकार क्षेत्रातील काही बँका अडचणीत आल्या असून त्यातील ठेवीदारांचे पैसे परत मिळतील का, हा गंभीर प्रश्न आहे. यासाठी एखादी मोठी चळवळ उभी करता येईल का, याचा विचार करण्याची गरज आहे. पतसंस्था, सहकारी बँका आणि सहकार विभाग सक्षम राहिला पाहिजे. सहकार क्षेत्रासमोर आज मोठे संकट असून ते वाचवणे हे मोठे आव्हान आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाणांचे सहकारातील योगदान मोठे : थोरात

ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्रातील सहकार चळवळ उभी करण्यात यशवंतराव चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांनी केवळ शेती न करता उद्योगपती व्हावे आणि हे परिवर्तन सहकाराच्या माध्यमातून घडावे, असे त्यांचे स्वप्न होते. सहकाराच्या माध्यमातून राज्यभर बँका उभ्या राहिल्या आणि सावकारांच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका झाली.

हा वारसा वसंतदादा पाटील यांनी पुढे नेला. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात हरित क्रांतीची सुरुवात झाली. १९७० ते १९९५ या काळात सहकारी क्षेत्रातून साखर कारखानदारी, सूतगिरण्या उभ्या राहिल्या आणि श्वेत क्रांतीही झाली. या २५ वर्षांच्या काळात सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध झाला. हे परिवर्तन म्हणजेच एक क्रांती होती.आज सहकार क्षेत्रापुढे मोठी आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करून सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सहकाराचा विचार काँग्रेसने रुजवला असून हा विचार पुढे वाढला पाहिजे, असे आवाहन थोरात यांनी केले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

6 मिनिटे ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

21 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

22 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

22 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

22 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

22 तास ago