मुख्य बातम्या

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन केला आणि काही क्षणांतच तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करुन आरोपी पसार झाला. विशेष म्हणजे, महिलेच्या हातात सोन्याऐवजी चक्क पितळेचे बिस्कीट ठेवून तिची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा शिक्रापुर पोलिसांनी CCTV आधारे छडा लावत बीड जिल्ह्यातून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

अभिमान बाबू तुपे (वय ४९, रा. पिठ्ठी निरगुडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याचा शोध सुरु आहे. करंदी येथील नंदा गणपत दरेकर (वय ५२) या २८ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी खंडाळे येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. शिक्रापुर येथील चाकण चौकात त्या वाहनाची प्रतीक्षा करत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. सुरुवातीला साध्या पद्धतीने बोलत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.

यानंतर त्याने दरेकर यांना चाकण चौकातून तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील सुपर बाजाराजवळ नेले. तेथे बोलण्याच्या बहाण्याने त्याने त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्या, तसेच गळ्यातील सोन्याची पानपोतही लंपास केली. दागिने घेऊन आरोपीने महिलेची फसवणूक लपविण्यासाठी आणखी एक बनाव केला. त्याने त्यांच्या हातात सोन्यासारखे दिसणारे बिस्कीट ठेवले आणि ते सोन्याचे असून, महिलेच्या अंगावरील सोन्यापेक्षा अधिक वजनाचे असल्याचे भासविले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.

मात्र, काही वेळाने दरेकर यांनी हातातील बिस्कीट तपासले असता त्यांना धक्काच बसला. बिस्कीट सोन्याचे नसून पितळेचे असल्याचे स्पष्ट झाले. आपल्याला गंडा घातल्याचे लक्षात येताच त्यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. घटनास्थळ तसेच आरोपीच्या हालचालींच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून आरोपीबाबत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.

CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी बीड जिल्ह्यात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिस पथकाने बीड जिल्ह्यात जाऊन अभिमान तुपे याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून महिलेच्या अंगावरील दोन सोन्याच्या बांगड्या आणि सोन्याची पानपोत, असे एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का…? याचा तपास पोलिसांकडून सुरु असून, फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. अशा प्रकारे अनोळखी व्यक्ती गोड बोलून विश्वास संपादन करत असेल किंवा सोन्याच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवत असेल, तर नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहायक पोलिस फौजदार लहानु बांगर, पोलिस हवालदार बापू हाडगळे, विश्वंभर वाघमारे आणि शिवाजी चितारे यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत हि कारवाई केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

1 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

21 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

22 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

22 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

22 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

22 तास ago