शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र, पीक पाहणीसाठी काही महसूल सहाय्यकांकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एका गटासाठी ठराविक रक्कम निश्चित केल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कान्हूर मेसाई परिसरातील महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला होता. मात्र, तक्रार करूनही त्यावर कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

एकीकडे शासनाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू असताना, दुसरीकडे पीक पाहणीच्या कामासाठीच शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचे आरोप होत असल्याने या प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.

पीक पाहणीचे काम पारदर्शकपणे व्हावे, शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम घेऊ नये आणि या आरोपांची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

14 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

15 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago