मुख्य बातम्या

शिरुर; रेस्टॉरंटमध्ये घरफोडी करणारी टोळी जेरबंद; इनोव्हा गाडीसह दोन आरोपी अटकेत

शिरुर (तेजस फडके) शिरुर ते न्हावरे रोडवरील ‘न्यू सागर रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार’मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणातील गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, पुणे (ग्रामीण) यांनी उघडकीस आणत सराईत चोरट्यांच्या टोळीतील तीन सदस्यांपैकी दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार एम एच ४३ एल १६०० जप्त करण्यात आली आहे.

शिरुर पोलीस स्टेशन येथे दि २७ जुलै २०२५ रोजी रात्री अज्ञात आरोपींनी शटरचे कुलूप तोडून रेस्टॉरंटमधून बिअरचे बॉक्स आणि विदेशी दारुच्या बाटल्या असा एकूण ६१ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत कुमार दिलीप जाधव (वय २३, रा. करडे, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तपासादरम्यान गुन्ह्याचा सखोल छडा लावताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार संशयित आढळली. या अनुषंगाने तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कामशेत परिसरातून दोन आरोपींना अटक केली

ताजुद्दीन दस्तगीर शेख (वय २५, रा. टाकळवांडे, ता. फलटण, जि. सातारा) गारेखनाथ ऊर्फ काळूराम काहू जाधव (वय ३४, रा. बोरखेडी, ता. शेणगाव, जि. हिंगोली) या दोघांनी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या सांगण्यानुसार सुनील दत्तू राउत (रा. राउतवाडी, कामशेत) हा देखील त्यांच्या सोबत होता. त्याचा शोध सुरु आहे.

या दोन आरोपींना अटक करुन शिरुर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून शिरुर न्यायालयाने त्यांना ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींवर यापुर्वीही रांजणगाव एमआयडीसी व सुपा पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, तसेच अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन आणि सागर धुमाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

DYSP ऑफिस जवळच हाकेच्या अंतरावर चाललाय वेश्या व्यवसाय ; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील जुगारांचे अड्डे बंद करण्याची मागणी

शिक्रापुर मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याला चार जणांकडुन बेदम मारहाण

शिक्रापुर येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटले

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago