महाराष्ट्र

‘फार्मसी’ च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना ‘कॅरी ऑन’चा लाभ

मुंबई: फार्मसी पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’ च्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. याप्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याचे साकडे राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले होते. याप्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे याविषयी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून फार्मसी पदविकेच्या प्रथम वर्षाच्या अनुतीर्ण विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देत थेट दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याला फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.

दरम्यान कालच (दिनांक २४ जुलै २०२३ रोजी) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन’चा लाभ देण्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने जारी केले आहे. या निर्णयाचा राज्यातल्या हजारो फार्मसीच्या विद्यार्थ्याना लाभ होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व फार्मसी महाविद्यालयांसह विद्यार्थी व पालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे शैक्षणिक कालावधी अत्यंत कमी मिळाला होता. फार्मसी पदविका अभ्यासक्रम वार्षिक असून फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या मानकानुसार हा कालावधी किमान १८० दिवसांचा असणे अपेक्षित होते. मात्र गतवर्षी हा कालावधी अवघा तीन ते चार महिने म्हणजे केवळ १०० ते १२० दिवस एवढाच मिळाला होता. याचा थेट परिणाम प्रथम वर्षाच्या निकालावर झाला होता. फार्मसीच्या पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’ चा निकाल पन्नास टक्याहून कमी लागला आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्यावर अतिरिक्त ताण येऊन त्यांच्यात नैराश्य वाढण्याची भिती होती. त्यामुळे याप्रश्नी काही तरी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी फार्मसीच्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले होते. प्रश्नाचे गांभीर्य आणि विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयासोबत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून कालच (दिनांक २४ जुलै २०२३ रोजी) फार्मसी पदविकेच्या शैक्षणिक वर्ष २०२२ – २३ मध्ये प्रवेशित असलेल्या आणि प्रथम वर्षाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना २०२३ – २४ मध्ये द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने तसे परिपत्रकसुध्दा जारी केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार असून विद्यार्थ्यांचे एका वर्षाचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी योगदान दिले. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत असून विद्यार्थी-पालकांसह फार्मसी शिक्षण संस्थांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

5 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

6 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

8 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago