महाराष्ट्र

मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा; नसीम खान

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली.

मुस्लीम समाजाला देण्यात आलेले आरक्षण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लीम समाजाला देण्यात आले होते. मा. उच्च न्यायालयानेही विशेष मागास प्रवर्ग अ अंतर्गत सामिल करुन शैक्षणिक आरक्षण बहाल केले व नोकरीतील आरक्षण पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. मागील ९ वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करत आहे. मुस्लीम समाजात ५० घटक आहेत, याचा सर्वंकष विचार करुन मुस्लीम समाजातील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी विनंती नसीम खान यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपासणी करुन योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. असेही नसीम खान यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

9 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

10 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

10 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

10 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

15 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

15 तास ago