महाराष्ट्र

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; ग्रॅच्युईटी, वेतनवाढ आणि ५ हजार नव्या बसांचा निर्णय

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या सक्षमीकरणासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम चालू आर्थिक वर्षात अदा करण्याचे मान्य करण्यात आले असून, नवीन वेतन करार होईपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा ३,००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २,००० रुपये अंतरिम हंगामी वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस परिवहन मंत्री Pratap Sarnaik, आमदार Sachin Ahir, आमदार Murji Patel, तसेच मुंबई महापालिका आयुक्त Ashwini Bhide, बेस्टच्या महाव्यवस्थापक Sonia Sethi आणि बेस्ट कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बेस्ट बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पुढील तीन वर्षांत बेस्टच्या ताफ्यात ५,००० नवीन मालकीच्या बसेस समाविष्ट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

तसेच बेस्ट प्रशासनाने तयार केलेला ‘कायापालट’ प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करून त्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळवून देण्याची ग्वाही देत, “बेस्ट ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असून तिचे सक्षमीकरण अत्यावश्यक आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टकेले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago