महाराष्ट्र

महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिवेशनात विधेयक शासन कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ यांनी ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून जाहीर केले असल्याचे सांगत, महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध पावले उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रम हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीमध्ये संवादाला महत्त्व असून संवादातूनच अनेक प्रश्न सुटू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ असून, पावसाळी अधिवेशनात जनहिताचे विषय, विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल, असे त्या म्हणाल्या.

राज्याच्या विकासासाठी शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवर सरकार सकारात्मक भूमिका मांडेल. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

14 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago