महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षेबाबत मोठा निर्णय!

प्रश्नपत्रिका वाटल्यावर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नो एन्ट्री

औरंगाबाद: दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त पार पडावी, यासाठी बोर्डाने प्रश्नपत्रिका १० मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर सुरु होण्यापूर्वीच केंद्रावर हजर राहणे बंधनकारक असणार आहे.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव अनुराधा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे ठोस नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर मिळेल, पण प्रश्नपत्रिका बरोबर ११ वाजता म्हणजेच पेपरची वेळ झाल्यावरच दिली जाणार आहे. दुसरीकडे बैठे पथकासोबतच प्रश्नपत्रिका पोच करणाऱ्या ‘रनर’वरील जबाबदारी वाढविली आहे. कस्टडीतून प्रश्नपत्रिका घेऊन निघाल्यानंतर अधूनमधून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग बोर्डाला पाठवावे लागणार आहे.

तसेच परीक्षा केंद्रांवर पोचल्यावर वेळोवेळी ‘रनर’ला त्यांच्याकडील मोबाइल किंवा कॅमेऱ्यात *व्हिडिओ रेकॉर्डिंग* करावे लागणार आहे. तत्पूर्वी, बोर्ड परीक्षेला कॉपी करणे गुन्हा आहे, कॉपी केल्यास काय शिक्षा होऊ शकते, पेपर पारदर्शक व प्रामाणिकपणे कसा सोडवायचा, याचे धडे शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात द्यायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटामागे देखील त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना बोर्डाने दिल्या आहेत.

रनर कडे व्हिडिओ रेकॉर्डिंगची जबाबदारी

दहावी-बारावीची परीक्षा यंदा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी बोर्डाने नवीन नियमावली तयार केली आहे. परीक्षेवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता पथकांची देखील भरारी पथके नेमली जाणार आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षा केंद्रांवर जाणाऱ्या ‘रनर’ला कस्टडीतून निघल्यापासून केंद्रावर पोचेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे. तसेच केंद्र संचालकांना सिलबंद पॉकिट देताना व दालनात प्रश्नपत्रिका वाटप करतानाही व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या बाबी…

प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेत लिहण्याचा असावा सराव

कॉपी केल्यास होईल कारवाई; ऑबजेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे सांगितली जाणार नाहीत

पेपर सुरु होण्यापूर्वी किमान अर्धा तास परीक्षा केंद्रावर पोचा

संपूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जा; कशाचाही मनावर तणाव नसावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

4 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

8 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

9 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago