औरंगाबाद: सीएनजी, पेट्रोल आणि डिझेल वाहनांव्यतिरिक्त आता बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. परंतु त्यांची किंमत जास्त असल्याने ग्राहकांना ही वाहने खरेदी करण्यासाठी थोडा विचार करावा लागतो, परंतु राज्यांनुसार सरकारकडून सबसिडी देखील दिली जात आहे. आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे.
येत्या एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांप्रमाणेच कमी केल्या जातील. यासोबतच पेट्रोल आणि डिझेलवर खर्च होणारे परकीय चलन आपण वाचवू शकू, असेही ते म्हणाले. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या बॅटर्या खूप महाग असतात. म्हणजे EV च्या एकूण खर्चापैकी ३५ ते ४० टक्के या बॅटऱ्यांवर खर्च होतो, ज्यामुळे EVs ची किंमत जास्त असते. हा खर्च कमी करण्यासाठी सरकारकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहेत. एवढेच नाही तर ग्राहकांना सुलभ चार्जिंग सुविधा देण्यासाठी अनेक ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन्सही उभारण्यात येत आहेत. मंत्र्यांच्या घोषणेनंतर ईव्हीच्या किमती कमी होतील, हे निश्चित झाले आहे, मात्र त्यासाठी किती वेळ लागेल हे अद्याप निश्चित करता आलेले नाही.
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…