मध्य प्रदेश: इथेनॉल मिश्रणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या केंद्र सरकारच्या धोरणाचे समर्थन करताना त्यांनी शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर टीका केली.
रीवा विमानतळावर कोलकाता-रीवा-भोपाळ हवाई सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमात जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाचे समर्थन केले. इथेनॉलच्या वापरामुळे इंधनासाठी परदेशावर असलेले अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, तसेच इथेनॉल उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला.
ब्राझीलमध्ये इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे सांगत भारतीय वाहनेही पूर्णपणे इथेनॉलवर चालण्यास सक्षम असल्याचे मिश्रा यांनी म्हटले. त्यामुळे इथेनॉल मिश्रणाच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, असा त्यांचा युक्तिवाद होता.
मात्र, शुद्ध पेट्रोलची मागणी करणाऱ्यांवर बोलताना मिश्रा यांची जीभ घसरली. “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येते का?” असे वक्तव्य त्यांनी व्यासपीठावरून केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावर आधीच मतमतांतरे व्यक्त होत असताना भाजप खासदारांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कार्यक्रमाला मध्य प्रदेशातील अनेक नेते उपस्थित होते.
मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…
मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…
तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…
बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…
मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…