महाराष्ट्र

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला असला तरी दक्षिण भारतातील जनतेने भाजपाचा विभाजनवादी विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नाकारले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगाल मध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने नियम व परंपरांचे उल्लंघन केले. एनआयए, सीआरपीएफ तसेच एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दडपशाहीचे वातावरण निर्माण करण्यात आले. तरीही भाजपाने गैरप्रकारांच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला, असा आरोप त्यांनी केला.

मात्र दक्षिण भारतात भाजपाची ही रणनीती निष्फळ ठरली. विशेषतः केरळ मध्ये काँग्रेसचा विजय हा लोकशाही व संविधानाचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसचा विचार आणि खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास दाखवला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.देशाला काँग्रेसचा विचारच तारू शकतो, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी म्हटले की, केरळमधील विजयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून हीच ऊर्जा आगामी काळात पक्षाला बळ देईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

2 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago