महाराष्ट्र

पुण्यात भाजपची भव्य तिरंगा रॅली; १५ ते २० हजार दुचाकींचा सहभाग? राष्ट्रवादीचे अमोल बालवडकर म्हणाले…

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात उद्या, मंगळवार (११ ऑगस्ट) रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तब्बल १५ ते २० हजार दुचाकी सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी रस्त्यावर उतरल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

बालवडकर यांनी म्हटले आहे की, एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना इंधनाची बचत करण्यासाठी वाहनांचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन करतात. मात्र, दुसरीकडे भाजपकडूनच हजारो दुचाकींचा सहभाग असलेली रॅली आयोजित केली जात आहे. त्यामुळे या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

पुणे शहर आणि परिसर आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत हजारो दुचाकींची रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आल्यास वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना रॅलीत सहभागी होण्यासाठी दुचाकींचे लक्ष्य देण्यात येत असल्याचा आरोपही बालवडकर यांनी केला आहे.

११ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता रॅलीला सुरुवात होणार असल्याने वाहतूक कोंडीचा मुद्दा अधिक गंभीर ठरू शकतो, असेही बालवडकर यांनी म्हटले आहे. सायंकाळच्या वेळेत कार्यालये सुटत असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर आधीच वाहनांची मोठी गर्दी असते. त्यात हजारो दुचाकींची भर पडल्यास त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर पुणे वाहतूक पोलिसांसमोरही मोठे आव्हान असणार आहे. रॅलीच्या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, आवश्यकतेनुसार वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे तसेच आपत्कालीन सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ न देणे, यासाठी वाहतूक पोलिसांना विशेष नियोजन करावे लागणार आहे.

आता भाजपच्या तिरंगा रॅलीमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेवर नेमका किती परिणाम होतो आणि वाहतूक पोलिसांकडून कोणती उपाययोजना केली जाते, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

11 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

11 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

11 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

11 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

12 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

12 तास ago