मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या सार्वजनिक चर्चांवर आणि काही नेत्यांच्या वर्तनावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “प्रोटोकॉलसोबत स्त्रीसन्मान अत्यावश्यक” असा ठाम सूर समर्थकांकडून उमटताना दिसत आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. या अपघाताबाबत संशय उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांमधून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “हा अपघात की घात?” असा सवाल उपस्थित होत असून संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याभोवती घडलेल्या काही प्रसंगांचे व्हिडिओ व्हायरल झाले. खुर्चीवर बसताना हाताचा दंड पकडल्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी जवळीक दाखवल्याचा आरोप काहींनी केला. या वर्तनावर सोशल मीडियात टीका होत असून, “एका सन्मान्य पदावर असलेल्या महिलेबाबत अशी वागणूक अयोग्य” अशी भावना व्यक्त होत आहे.
‘डिझाईन बॉक्स्ड’ वाद पुन्हा चर्चेत
पूर्वीही निवडणुकीदरम्यान नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या फोटोवरून वाद निर्माण झाला होता. यावर आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. “अजितदादांच्या खांद्यावर हात का ठेवला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून स्पष्टीकरण देत सांगण्यात आले की, मिटकरी यांचे मत वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही. ‘डिझाईन बॉक्स्ड’ या पीआर कंपनीची भूमिका आणि सोशल मीडिया निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप यावरूनही मोठी चर्चा रंगली होती.
महिला आयोग गप्प का?
या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाची भूमिका काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. विशेषतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा वाढली आहे.
“स्त्रीसन्मान प्रथम” – समर्थकांचा इशारा
सुनेत्रा पवार या पतीच्या आकस्मिक निधनानंतरही खंबीरपणे जबाबदारी पार पाडत आहेत. “त्या योग्य वेळी बोलतील, पण सार्वजनिक अवमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा समर्थकांनी दिला आहे.
दोन्ही गटांतील नेत्यांनी वैयक्तिक टीका थांबवून राजकीय सभ्यता राखावी, अशी मागणी होत आहे. “हा महाराष्ट्र आहे; इथे प्रत्येक पावलावर लक्ष्मणरेषा आहे,” असे म्हणत स्त्रीसन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…
रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…
नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…
जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…
मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…
काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…