महाराष्ट्र

उच्च व तंत्रशिक्षणातही ‘पवित्र’सारखी भरती प्रक्रिया? मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सकारात्मक संकेत

मुंबई: शालेय शिक्षण विभागातील ‘पवित्र’ पोर्टलप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातही पारदर्शक पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केले.

राज्यातील शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील पदभरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलसारखी केंद्रीकृत यंत्रणा निर्माण करण्यात येणार का, असा प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील बोलत होते.

सध्याची भरती प्रक्रिया कशी?

मंत्री पाटील यांनी सांगितले की, शासनमान्य विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पदभरती करताना आठ सदस्यांचे मुलाखत पॅनल असते.

पॅनलमधील प्रत्येक सदस्य उमेदवारांना गुण देतो.

संचालकांचा सहभाग प्रामुख्याने ‘ना हरकत’ देण्यापुरता मर्यादित असतो.

सर्व सदस्यांनी दिलेले गुण एकत्रित करून विद्यापीठाला कळविले जातात.

अंतिम मान्यता विद्यापीठाकडून दिली जाते.

सुधारित प्रक्रियेवर विचार

शिक्षण विभागाप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पारदर्शक आणि सुधारित भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या असून, त्यावर उच्च व तंत्रशिक्षण विभाग गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि एकसंधता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

11 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

11 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

12 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

17 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

17 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

17 तास ago