महाराष्ट्र

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहून सपकाळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गांधी स्मारक निधीचे विश्वस्त तुषार गांधी, अन्वर राजन, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चव्हाण, प्रवीण सप्तर्षी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आयुष्यभर गांधीवादी विचार, भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी संघर्ष केला. गांधींच्या मारेकऱ्यांच्या विचारसरणीला आणि प्रतिगामी प्रवृत्तींना त्यांनी ठामपणे विरोध केला. आजच्या काळात त्यांनी जपलेली विचारांची परंपरा आणि संविधान, लोकशाही तसेच गांधीवादी मूल्यांच्या रक्षणाची लढाई अधिक जोमाने पुढे नेण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले की, डॉ. कुमार सप्तर्षी हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारविश्वातील एक दीपस्तंभ होते. विचारांप्रती निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनाची अखंड तळमळ हीच त्यांची खरी ओळख होती. समाजपरिवर्तनासाठी दिलेले त्यांचे योगदान, युवकांना दिलेली वैचारिक दिशा आणि अन्यायाविरोधातील त्यांचा संघर्ष कायम प्रेरणादायी राहील, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

8 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago