महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर मधून दर ३६ तासाला १ पुरुष गायब

५ महिन्यात तब्बल २७९ पुरुष बेपत्ता…

संभाजीनगर: गेल्‍या ५ महिन्यात संभाजीनगर शहरातील तब्‍बल २७९ पुरुषही घर सोडून गेले आहेत. त्‍यापैकी १४४ पुरुषांचा शोध पोलिसांनी लावला असून १३५ जण अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्‍हणजे पुरुषांच्‍या बेपत्ता होण्‍यामागे कौटुंबिक कलह, कर्जबाजारीपणा, अनैतिक संबंध, मानसिक आजार, नैराश्‍य, नापसंत मुलीशी विवाह करणे, वडिलांचे रागावणे, पालकांनी दुचाकी घेऊन न देणे यांसारखी कारणे पुढे येत आहेत. त्‍यातही यात उच्‍चशिक्षित आणि उच्‍च मध्‍यमवर्गीय कुटुंबांतील पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. बेपत्ता पुरुषांचा शोध चालू असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

मानसिक कमकुवतपणा हेच आहे मूळ कारण

समस्‍यांना सामोरे न जाणे, समाजाचा दबाव, कुटुंबातील प्रश्‍न हाताळता न येणे, वाढत्‍या अपेक्षा, सततचे अपयश आणि तणावपूर्ण नातेसंबंध यांमुळे घर सोडून जाणार्‍यांचे वाढते प्रमाण हा चिंताजनक विषय आहे. त्‍यासाठी समस्‍या हाताळण्‍याचे कौशल्‍य, कुटुंबातील संवाद आणि सामंजस्‍य यांतून हे प्रश्‍न सोडवता येतात. रागाच्‍या भरात घर सोडून जाण्‍यापेक्षा जवळचे मित्र, वरिष्‍ठ आणि मार्गदर्शक यांच्‍यासमवेतच्‍या चर्चेतून मार्ग निघू शकतो. कुटुंबप्रमुख म्‍हणून पुरुषांवर समाजाचे अधिक ओझे असते. त्‍यातून हे प्रकार होत असावेत, असे मत समुपदेशक संदीप शिसोदे यांनी व्‍यक्‍त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago