शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील डोंगरगण येथे एका तरुणीच्या घरी जाऊन जबरदस्तीने तिचा हात ओढत तु माझ्यासोबत आली नाहीस. तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारुन टाकीन. तसेच तुला मांडवातुन उचलून नेईन, तुझ्यावर ऍसिड हल्ला करीन अशी धमकी देऊन विनयभंग केल्याप्रकरणी निखील एकनाथ चोरे आणि विकास बाबाजी चोरे दोघे रा. डोंगरगण (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 25) रोजी संध्याकाळी 6:30 च्या सुमारास फिर्यादी तरुणी आणि तिची आई घरी असताना निखील एकनाथ चोरे व त्याचा मित्र विकास बाबाजी चोरे हे दोघेही मोटार सायकल वर आले. त्यातील निखील चोरे याने सदर तरुणीचा हात धरून त्याचेकडे ओढत तिचा विनयभंग केला. त्यावेळेस त्या तरुणीने नकार देत असताना त्याने तरुणीच्या मानेला धरून तिच्या कानाजवळ येवून तिला म्हणाला की, तु माझ्यासोबत आली नाही. तर मी तुझ्या मम्मी-पप्पाला मारुन टाकीन, तुझे लग्न होवू देणार नाही, तुला मांडवा मधून उचलून नेईन, तुझे तोंडावर ऍसिड फेकून मारीन अशी धमकी दिली.
त्यानंतर संबंधित युवतीने शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत निखिल एकनाथ चोरे आणि त्याचा मित्र विकास आबाजी चोरे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहल चरापले करत आहेत.
मुंबई: महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…