आरोग्य

दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय

ओरल हेल्थ चांगली तर संपूर्ण आरोग्य उत्तम असं म्हटलं जातं. दातांची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण दररोज ब्रश करतोच. असे असले तरीही दात कितीही काळजी घेऊन स्वच्छ ठेवले तरी देखील काहीवेळा दातांच्या अनेक समस्या सतावतात. दातांना कीड लागणे, दात खराब होणे, दातांमध्ये खड्डे पडणे, दातदुखी अशा दातांच्या अनेक समस्या हैराण करतात. दातांच्या या लहान – मोठ्या समस्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो.

या उपायांमध्ये आपण शक्यतो वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स, गोळ्या, औषध घेतो. काहीवेळा असे वेगवेगळे उपाय करून देखील दातांच्या समस्या काही केल्याशिवाय कमी होतच नाहीत. अशा परिस्थितीत, आपण काही घरगुती उपाय करण्याला प्राधान्य देतो. दातांसाठी घरगुती उपाय करताना आपण नेहमीच्या वापरातील स्वयंपाक घरातील लसूण आणि मिठाचा नैसर्गिक उपाय करून पाहू शकतो. दातांसाठी लसूण आणि मिठाचा नैसर्गिक उपाय करण्यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात.

दातदुखी सारख्या दातांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेल्या अ‍ॅलिसिनचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म दातदुखीच्या समस्येपासून आराम देतात. त्यामध्ये असलेले अ‍ॅलिसिन नावाचे संयुग बॅक्टेरिया नष्ट करण्यास उपयुक्त ठरतात. लसूण दात किडण्यास जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करू शकतो.

लसूण पाकळ्यांमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म जंतूं नष्ट करू शकतात. यासाठी तुम्ही लसूण बारीक करून जे दात खराब झालेत त्या दातांवर घासून लावू शकता. यामुळे लवकर आराम मिळतो. याचबरोबर, दातदुखी, हिरड्यांच्या सूज आणि कॅविटीसारख्या समस्यांवर आराम मिळवण्यास मदत करते.

दातांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण थेट लसूण पाकळी चावून खाऊ शकतो. यासोबतच, लसूण पाकळ्या कुस्करून त्यात चिमूटभर मीठ घालून या मिश्रणाने दात घासल्यास दातांना लागलेली कीड नष्ट होते.

लसणाचे तेल किंवा पेस्ट किडलेल्या दातांवर लावा यामुळे दातांना कीड लागण्याची समस्या कमी होते. लसूण लसूणही दाताच्या दुखण्यासाठी आरामदायी आहे. कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावा. लसूण कापूनही दाताजवळ पकडू शकता. लसणामध्ये एलिसीन असतं जे आपल्या दातातील जंतू नष्ट करतात आणि दाताला आराम मिळतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

8 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

8 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

8 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

13 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

14 तास ago