महाराष्ट्र

जुन्नरमध्ये चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्या; आरोपीवर कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तपासाचा आढावा घेतला.

या प्रकरणाची पारदर्शक आणि सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची विशेष विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगत, लवकरच स्वतः पिंपळवंडी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

4 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

4 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

5 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

5 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

5 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

15 तास ago