पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात
पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या पुढाकारातून नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री Shambhuraj Desai यांनीही या उपक्रमात सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबत बैलगाडीचे सारथ्य केले. विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांनी त्यांचा उत्साह वाढवला आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित केला.
वाजंत्र्यांच्या गजरात, ग्रामस्थांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात चिमुकल्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेत आगमनानंतर मंत्री देसाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण संस्कृती, शिक्षणाबद्दलची आस्था आणि शाळेविषयीचा ग्रामस्थांचा जिव्हाळा या उपक्रमातून अधोरेखित झाला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या स्वागतासाठी एकवटलेल्या गावकऱ्यांचा उत्साह यामुळे मरळी येथील शाळा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…