महाराष्ट्र

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA), पुणे यांच्या वतीने ‘नारीदृष्टी’ (Nurturing Visionary Women Leaders for Transformation in Academia) या पाच दिवसीय निवासी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते झाले.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महिला प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन, प्रशासन, शैक्षणिक धोरण आणि संस्थात्मक नेतृत्व या क्षेत्रांतही पुढे यावे, असे आवाहन केले. ‘नारीदृष्टी’सारखे उपक्रम महिला प्राध्यापकांचा आत्मविश्वास वाढवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात पंतप्रधान Narendra Modi यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे सांगत, शिक्षण, विज्ञान, उद्योग, प्रशासन आणि संरक्षण क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान त्यांनी अधोरेखित केले.

उच्च शिक्षण संचालक Dr. Shailendra Deolankar यांनी सांगितले की, ‘नारीदृष्टी’ महिला नेतृत्वाला नवी दिशा देईल, तर शिक्षकांसाठी सुरू करण्यात आलेले इतर प्रशिक्षण कार्यक्रम तंत्रज्ञानाधारित आणि परिणामकेंद्रित शिक्षण अधिक मजबूत करतील.

या कार्यक्रमात राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील महिला प्राध्यापक सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्व विकासासाठी विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

याच वेळी ‘Teaching with Smart Technology FDP’, ‘Project-Based Learning FDP’ आणि ‘CO-PO Integration & Micro Planning for Outcome-Based Accreditation FDP’ या तीन अध्यापक विकास कार्यक्रमांचेही उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास Dr. Bhushan Patwardhan, Dr. Suresh Gosavi, Dr. Sunil Bhirud आणि Hemlata Bagla यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिंदोडी विकास सोसायटीची आर्थिक भरारी; शेतकऱ्यांना साडेसहा कोटींहून अधिक कर्जपुरवठा; लाभांश वाटप…

शिंदोडी (तेजस फडके) : शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याबरोबरच सहकार क्षेत्रात आर्थिक शिस्त आणि विश्वासार्हतेचा आदर्श…

30 मिनिटे ago

Video! चिंचणीच्या गायरान जमिनीवर वाळूमाफियांचा बेकायदेशीर कब्जा; महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की अभय…?

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदेशीर वाळू…

38 मिनिटे ago

Video; वाळू माफिया दिवसाढवळ्या घोड धरणाचे लचके तोडत असताना पुणे आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी ठरलेल्या चिंचणी (ता.…

23 तास ago

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

2 दिवस ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

2 दिवस ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

2 दिवस ago