मुंबई: जुन्नर तालुक्यात अल्पवयीन मुलीबाबत घडलेली घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, मुलींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दिला.
जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा नागवडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिस प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला पूर्ण संरक्षण देत न्याय मिळवून द्यावा, असेही नागवडे यांनी म्हटले आहे.पीडित मुलीची ओळख गोपनीय ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. तिच्या कुटुंबाच्या दुःखाचा किंवा परिस्थितीचा गैरवापर होणार नाही, याची समाजाने काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी आपण ठामपणे उभे असून, या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका वैशाली नागवडे यांनी व्यक्त केली.
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…
जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…