महाराष्ट्र

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, राज्याने परकीय गुंतवणुकीसाठी मोठे उद्दिष्ट ठेवले असून दावोस जागतिक आर्थिक मंच येथे महाराष्ट्राने सर्वाधिक सामंजस्य करार करून देशात आपले अग्रस्थान टिकवले आहे. अपूर्ण जलप्रकल्प पूर्ण करून शेती क्षेत्राला चालना देण्यासह प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यावर शासनाचा भर आहे.

सातारा जिल्ह्यातील ‘मॉडेल स्कूल’ व ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांचे सादरीकरण थेट नरेंद्र मोदी यांच्यासमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीतून ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू असून विकासासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन समन्वयाने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ध्वजारोहणापूर्वी पालकमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच कर्नल महाडिक स्मृती उद्यानात आदरांजली अर्पण केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago