राजकीय

उबाठाला मोठा धक्का! सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे.

उबाठा गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष पढयार, विनायक डायरे, तसेच मुंबई समन्वयक प्रथमेश बोऱ्हाडे, स्वप्नील सावंत, ॲड. दक्षता ठाकूर आणि सुशांत कावीर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच शिवसेनेचे विचार आणि सरकारच्या विकासकामांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सोशल मीडिया विभागाला मोठी जबाबदारी

सोशल मीडिया हे सध्याच्या काळात जनतेशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका, सरकारची विकासकामे, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी सोशल मीडिया विभागावर असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

सोशल मीडिया विभागाचे काम केवळ पक्षाच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचावे. नागरिकांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना व्यासपीठ देण्याचे कामही सोशल मीडिया विभागाने करावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील शिवसेनेच्या सोशल मीडिया संघटनेला मोठे बळ मिळाले आहे. आगामी काळात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासोबतच शिवसेनेचे विचार आणि विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा, मुंबई विभाग प्रमुख राज कुळकर्णी, महादेव सलवडे, मयुर मगर तसेच सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

9 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

10 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

10 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

10 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

10 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

21 तास ago