महाराष्ट्र

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम

स्वतंत्र चौकशीची अमोल मातेले यांची मागणी

मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण होऊनही केवळ सुमारे ५० टक्के विद्यार्थ्यांचेच प्रवेश पूर्ण झाल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.

ॲड. मातेले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर किमान ९० टक्के प्रवेश पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप केवळ निम्म्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक संभ्रमाच्या स्थितीत आहेत. उर्वरित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी फेऱ्या घ्याव्या लागल्यास महाविद्यालयांचे नियमित अध्यापन किमान आणखी एक महिना उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.

निकाल लवकर जाहीर केल्याचा सरकारने गाजावाजा केला, मात्र प्रवेश प्रक्रियाच वेळेत पूर्ण होत नसेल तर लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा झाला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रवेश प्रक्रियेत अनावश्यक विलंब का होत आहे, जागा उपलब्ध असूनही प्रवेश का होत नाहीत, यामागे तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटी आहेत का, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या हिताशी संबंधित या प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार, हलगर्जीपणा किंवा अनियमितता झाली आहे का, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्य मागण्या :

तीन फेऱ्यांनंतरही कमी प्रवेश होण्यामागील कारणे तातडीने जाहीर करावीत.

प्रवेश प्रक्रियेचे स्वतंत्र व निष्पक्ष लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात यावे.

रिक्त जागा आणि प्रवेशांची संपूर्ण आकडेवारी सार्वजनिक करावी.

उर्वरित प्रवेश प्रक्रिया वेगाने पूर्ण करून महाविद्यालये नियमित सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी.

विद्यार्थी व पालकांची गैरसोय टाळण्यासाठी पारदर्शक आणि वेळबद्ध प्रवेश प्रक्रिया राबवावी.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून प्रवेश प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करावेत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष विद्यार्थी व पालकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही ॲड. अमोल मातेले यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

11 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

11 तास ago