महाराष्ट्र

मुंबईतील मृत्यूंवरून फडणवीस सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर तीव्र टीका केली आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नसून सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

मुंबईतील गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी राज्यातील पावसाळी परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी आणि पूर्वतयारी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्यामुळे नागरिकांचे जीव जात असल्याचे त्यांनी म्हटले.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर सुमारे ७,१८१ कोटी रुपये खर्च करूनही अवघ्या दोन महिन्यांत वाहतूक बंद ठेवावी लागल्याचा उल्लेख करत त्यांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार आणि तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून प्रकल्प पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ‘टेस्टिंग पिरियड’मध्ये असल्याचे केलेले विधानही सपकाळ यांनी फेटाळले. २०१४ पासून राज्यात भाजपचे सरकार असून अजूनही ‘टेस्टिंग’ सुरू असल्याचे सांगणे हे जनतेची दिशाभूल करणारे असल्याची टीका त्यांनी केली.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरही टीका करत विविध राजकीय मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

2 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

2 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

2 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

3 तास ago

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…

3 तास ago

दुष्काळावर सरकारचा ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा’ कारभार; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून…

3 तास ago