महाराष्ट्र

अजितदादा पवारांच्या जयंतीनिमित्त २२ ते २६ जुलै ‘जनसेवा सप्ताह’

राज्यभर वृक्षारोपण, आरोग्य, महिला व शेतकरी उपक्रम

मुंबई: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर २२ ते २६ जुलै दरम्यान ‘जनसेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी, युवक, सामाजिक आणि अल्पसंख्याक समाजासाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सुनिल तटकरे यांनी दिली.

‘हरित महाराष्ट्र, वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली, दादांची दृष्टी, हरित सृष्टी’ या संकल्पनेवर राज्यभर व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री देवराई फाऊंडेशनमार्फत ‘देवगिरी ते देवराई’ हा वृक्षसंवर्धन उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविला जाणार आहे.

जनसेवा सप्ताहात रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, मधुमेह, रक्तदाब, डोळे, स्तन व गर्भाशय कर्करोग तसेच मुख कर्करोग तपासणी, ऑस्टीओपोरोसिस निदान शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. याशिवाय सार्वजनिक स्वच्छता मोहीम, गडकिल्ले व स्मारक स्वच्छता, आषाढी वारीत वारकरी सेवा उपक्रमही राबविले जातील.

महिलांसाठी राज्यस्तरीय मेळावे, बचत गट सक्षमीकरण, स्वयंरोजगार मार्गदर्शन, सूक्ष्म कर्ज, कौशल्य प्रशिक्षण आणि अजितदादा महिला सशक्तिकरण पुरस्कार देण्यात येणार आहेत. कृषी क्षेत्रात एआय आधारित कार्यशाळा, कृषी प्रदर्शने, शेतकरी मार्गदर्शन आणि प्रगतशील शेतकऱ्यांचा अजितदादा कृषी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

युवकांसाठी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे युवा संकल्प शिबिरे, नेतृत्व विकास कार्यशाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. विविध क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानही करण्यात येईल.

अल्पसंख्याक समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सेवा संकल्प शिबिरे आयोजित केली जाणार असून, जनसेवा सप्ताहाच्या नियोजनाची जबाबदारी संबंधित पालकमंत्री व संपर्कमंत्र्यांवर सोपविण्यात आली असल्याचे सुनिल तटकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

3 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

3 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

3 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

3 तास ago

दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर

नागपूर, वर्धा, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांशी साधणार संवाद मुंबई: महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा…

3 तास ago

दुष्काळावर सरकारचा ‘तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा’ कारभार; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता आणि MPSC अध्यक्षांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांच्या चौकशीवरून…

3 तास ago