महाराष्ट्र

काँग्रेसचा २८ ऑगस्टला नांदेडच्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा

गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती.

मुंबई: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भेट देणार आहे.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, नांदेड दक्षिण ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश उपाध्यक्ष यशपाल भिंगे, सरचिटणीस डॉ. दिनेश नखाते, ऍड सुरेंद्र घोडजकर, श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण व सचिव धनराज राठोड यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल आणि काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago