महाराष्ट्र

महानगरपालिका क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे राज्यभरात आंदोलन…

राज्यातील महानगरपालिकांमधील ‘प्रशासनराज’ मुळे जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन वर्षांपासून झालेल्या नसल्याने सर्व कारभार प्रशासनच चालवत आहे. महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. भाजपा युती सरकार प्रशासनाच्या माध्यमातून फक्त टक्केवारी वसुलीचे काम करत असून जनतेला मात्र वाऱ्यावर सोडले आहे. महानगरातील जनतेच्या समस्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसने राज्यातील विविध महानगरपालिका क्षेत्रात आज आंदोलन केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभाराविरुद्ध नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अँड आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढून महानगरपालिकेच्या गेटवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोग्य, पाणी, रस्ते, शैक्षणिक व सुरक्षा मुलभूत हक्कांसाठी तसेच महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवण्यात आला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

पनवेल महानगरपालिकेच्या कारभार विरुद्ध पनवेल तालुका व पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सचिव मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस प्रभारी राणी अग्रवाल, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर विविध नागरी समस्यांबाबत आंदोलन करून आयुक्त अनिलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस जो जो थॉमस, प्रदेश सचिव धनराज राठोड, वसई विरार जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर धरणे आंदोलन केले. यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, वीरेंद्र जगताप, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकरेत उपस्थित होते. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन शेतकरी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी खा. डॉ. कल्याणराव काळे, जिल्हा पक्ष प्रभारी माजी.आ.नामदेवराव पवार, माजी आ. कैलास गोरंट्याल, मा. आ. राजेश राठोड, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रातही आंदोलन करून भाजपा युती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

17 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago