महाराष्ट्र

प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी मंदिरातील फोटोंवरून वाद; ‘सामान्यांसाठी एक नियम, सेलिब्रिटींसाठी दुसरा?’

गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी

मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तुळजाभवानी मंदिरातील दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतानाचे तिचे फोटो अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरले असले, तरी गाभाऱ्यात फोटो काढण्यावर असलेल्या कथित निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सोशल मीडियावर अनेकांनी, “सर्वसामान्य भाविकांना गाभाऱ्यात फोटो काढण्यास मनाई असते, मग सेलिब्रिटींना ही परवानगी कशी मिळाली?” असा सवाल उपस्थित केला आहे. “सामान्यांसाठी एक नियम आणि कलाकारांसाठी दुसरा का?” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत.

काही नेटकऱ्यांनी मंदिर प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. देवाच्या दारी सर्व भाविक समान असून मंदिरातील नियम सर्वांसाठी सारखेच लागू व्हावेत, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप मंदिर प्रशासन किंवा प्राजक्ता माळी यांच्याकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे या वादावर पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

21 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago