महाराष्ट्र

‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! काँग्रेसवरच भडकल्या अंजली दमानिया; सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ भूमिका

काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; “अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही”

मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान घडलेल्या एका व्हिडिओवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बीडच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यापासून धनंजय मुंडे यांनी पत्रकाराला रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेवरून काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना “गुंगी गुडिया” म्हणत टीका केली. मात्र, या शब्दप्रयोगावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र आक्षेप घेत काँग्रेसलाच धारेवर धरले.

अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये काँग्रेसच्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गुंगी गुडिया? काय ही भाषा? एका पक्षाला ही भाषा शोभते का? पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? मी राष्ट्रवादीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे, पण सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरलेले हे शब्द पूर्णपणे चुकीचे आहेत. मी याचा तीव्र निषेध करते,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेसने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत “सुनेत्रा पवार, अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार?” असा सवाल उपस्थित केला होता. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही टीकेची झोड उठवत “बीडचे हुकूमशहा?” असा आरोप केला होता.

हा संपूर्ण वाद बीडमधील जिल्हा नियोजन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतून सुरू झाला. कायदा-सुव्यवस्थेबाबत पत्रकाराने प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करताच धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. आता या प्रकरणात अंजली दमानिया यांनी काँग्रेसच्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतल्याने या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

23 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago