महाराष्ट्र

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरणाऱ्या 329 ग्राहकांवर गुन्हे दाखल

बारामती: महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असणाऱ्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे किंवा शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार आढळले असून, 329 ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून कनेक्शन तात्पुरते बंद केले जाते. पुढील तीन महिन्यातही जर थकबाकीचा भरणा केला नाही तर मात्र कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जाते. जोपर्यंत त्या बंद कनेक्शनची थकबाकी व्याज व दंडासहित भरली जात नाही तोवर त्या जागेवर नवीन कनेक्शन दिले जात नाही. बारामती परिमंडलात अशा प्रकारच्या 5 हजारांहून अधिक प्रकरणांची पडताळणी झाली. ज्या ठिकाणी थकबाकीचा भरणा झाला त्यांना वगळून तब्बल 329 प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यात त्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी तब्बल 37 लाख 95 हजारांचा दंड वसूल होणे अपेक्षित आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. बारामती परिमंडलात मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी धडक कारवाई केली. त्यातून सातारा जिल्ह्यात 1 तर सोलापूर जिल्ह्यात तब्बल 273 तसेच बारामती मंडलात 55 असे एकूण 329 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईने परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास…

7 तास ago

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २७) दुपारी एक भावनिक…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पारोडी गावात उद्या पिरसाहेबांची यात्रा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली सुप्रसिद्ध पिरसाहेबांची पारंपरिक यात्रा…

2 दिवस ago

चिंचणीच्या जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर चिंचणी येथील जिल्हा परिषद शाळेत माजी…

4 दिवस ago

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

पाबळ (सुनिल जिते) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती झाल्याने तयारी सुरु झाली…

4 दिवस ago