महाराष्ट्र

अनाथ विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधार; उच्च शिक्षणासाठी पुढाकार

 

ठाणे : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या बालस्नेहालयातील चार अनाथ विद्यार्थ्यांच्या पाठीशी राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde खंबीरपणे उभे राहिले आहेत. विद्यार्थ्यांच्या संघर्षाची आणि जिद्दीची दखल घेत त्यांनी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ठाणे पालिका आणि Rainbow Foundation संचालित बालस्नेहालयातील साहिलकुमार शहा, गिरीश शार्दूल, विशाल शर्मा आणि गीतेश भोईर या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही ५५ ते ७२ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांपैकी दोघांना विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन इंजिनिअर बनायचे आहे, तर एकाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि दुसऱ्याला हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर घडवायचे आहे.

विद्यार्थ्यांच्या या स्वप्नांची दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश Anand Vishwagurukul Junior College येथे तातडीने निश्चित करण्याचे निर्देश संस्थेचे सचिव डॉ. प्रा. प्रदीप ढवळ यांना दिले आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांना केवळ प्रवेशच नव्हे, तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी आवश्यक ती मदत व आधार देण्याचे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. या निर्णयामुळे चारही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळाली असून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

9 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

10 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

10 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

10 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

10 तास ago